तुळजापूर / प्रतिनिधी-

 जिल्हा महिला बालविकास अधिकारी व चाईल्ड लाईन बाल संरक्षण कक्ष उस्मानाबाद यांनी नेमलेल्या टास्क फोर्स ने  मंदीर परिसरातील रस्त्यावर भिक्षा मागणाऱ्या व फिरणा-या सहा बालकांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार दि.१३रोजी सकाळी १०वाजण्याचा सुमारास करण्यात आली. 

यातील तीन बालकांना  बालनिरक्षण गृह उस्मानाबाद येथे  एकास  आपले घर नळदुर्ग येथे व एकामुलीस शंभर रुपये स्टँम्पवर  हमीपञ घेवुन   पालकाचा ताब्यात दिले .

तर या कारवाईत कल्याण (जि ठाणे) येथील याञेसाठी आलेले पण चुकलेले बालक सापडले त्याला त्याचा पालकाची ओळख पटवून पालकाचे हमीपञ घेवुन पालकांचा ताब्यात देण्यात आले. यात तुळजापूर येथील एका मुलीस तिच्या पालकाकडुन शंभररुपये स्टँम्वर हमीपञ घेवुन पालकाचा ताब्यात टास्कफोर्स ने दिली


 
Top