तेर  / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील पुरातन व जागृत देवस्थान असलेल्या श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात नृसिंह जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

लाखो भाविक भक्तांसह नागरिकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील तेरणा नदीच्या काठावर वसलेल्या श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात  नृसिंह जयंतीनिमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भागवताचार्य पद्मनाभ महाराज व्यास यांचे श्री नृसिंह अवतारावर प्रवचन झाले. नृसिंह मूर्तीस सामुदायिक अभिषेक करण्यात आला. तसेच नृसिंह जयंतीनिमित्त मंदिरासह गाभाऱ्यात फुलांची सजावट कै. लताताई शरदराव पुराणिक यांच्या स्मरणार्थ व पुराणिक परिवार पुणे यांच्या वतीने करण्यात आली. या वेळी पंचक्रोशीतील भाविक-भक्तांसह नागरिकांनी नृसिंह जयंतीनिमित्त कार्यक्रमांचा लाभ घेतला. जन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिराचे पुजारी विजयकुमार बडवे दिलीप बडवे, नरहरी बडवे, वैभव बडवे, संतोष बडवे आदीसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.


 
Top