उस्मानाबाद / प्रतिनिधी-
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वतीने उस्मानाबाद व कळंब तालुक्यात अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.
मुस्लिम बांधवांना रमजान या पवित्र महिन्यांमध्ये रोजे उपवास असतात त्यानूशंगाने अनेक इफ्तार पार्ट्यांचे आयोजन केले जाते. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून हिंदू-मुस्लीम अनेक लोक एकत्र येतात व सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी अशा इफ्तार पार्ट्या महत्त्वाच्या असतात हीच गोष्ट लक्षात ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी येडशी येथे इफ्तार पार्टीचे आयोजन मुस्लिम व हिंदू बांधवांसाठी केले होते.
यावेळी डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी इफ्तार पार्टीला उपस्थित असणाऱ्या सर्व मुस्लिम बांधव व हिंदू बांधवांचे आभार मानून कौतुक केले. यावेळी जामा मस्जिदचे अध्यक्ष जब्बार पटेल,विजय कुमार सस्ते,प्रमोद वीर,सईद काझी,मौलाना अहमद पटेल, सत्तार पटेल, सरफराज पटेल, अशोक पवार,बाबा तवले, नंदकुमार गवारे महेश नलावडे,सलाउद्दीन शेख,अकबर तांबोळी, हैदरअली पटेल, शमशुद्दीन पटेल,खालील शेख,चाँद तांबोळी यांच्यासह अनेक हिंदू व मुस्लीम बांधव उपस्थित होते.