उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रागंणात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते झाले.

   ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर आणि इतर मान्यवरांनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. यानंतर जिल्हयामध्ये महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी महिला अत्याचार विरोधी जनजागृती  करण्यासाठी तसेच प्रत्येक वयोगटातील मुले व महिला यांचा पोलिसांप्रति विश्वास वाढविण्यासाठी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पोलीस काका तसेच पोलीस दीदी यांच्यामार्फत महिला पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे.या प्रकल्पांतर्गत जिल्हयातील सर्व शाळा आणि महाविद्यालयामध्ये आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण आणि महिला बालकांविषया संबंधि कायदे याबाबतचे मार्गदर्शक सत्र आयोजित केले जाणार आहेत.या अंतर्गत प्रायोगिक तत्वावर उस्मानाबाद शहरातील 40 विद्यार्थ्यांना उस्मानाबाद जिल्हा तायक्वांदो असेासिएशन याच्या तर्फे आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत.हे प्रशक्षिण पूर्ण केलेल्याचा प्रशिस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

पोलीस दलात सलग 15 वर्षे उत्कृष्ट सेवा देऊन उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्यल जिल्हयातील 7 पोलीस अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह प्राप्त झाले आहेत.हे सन्मान चिन्हाचे जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले.यात आर.एम.ठाकुर,के.बी.रोकडे,जी.आय. पठाण, एच.एम.पठाण,आर.डी.कवडे,आर.डी.कचरे आणि एम.डी.कळसाईन यांचा समावेश आहे. यावेळी समाज कल्याण तर्फे आयोजित सामाजिक न्याय विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलचे श्री.दिवेगावकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.यावेळी समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत उपस्थित होते.

    या समारंभास पोलिस अधीक्षक निवा जैन,जि.प.चे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता,अपर जिल्हाधिकारी रूपाली आवले,जि.प.चे अतिरिक्त मुख्याधिकारी विकास जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ.प्रताप काळे,उपजिल्हाधिकारी (रोहयो)महेंद्रकुमार कांबळे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक पी.पी.शिंदे, विशेष भूसंपादन अधिकारी राजकुमार माने, जि.प.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) डॉ.नितीन दातार,उस्मानाबादचे उप विभागीय अधिकारी योगेश खरमाटे,सामान्य प्रशासनचे तहसीलदार प्रविण पांडे, उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माळी,नायब तहसीलदार (महसूल) पंकज मंदाडे यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक,अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

 आवले यांच्या हस्ते ध्वजारोहण

 महाराष्ट्र  दिनानिमित्त्‍ येथील प्रशासकीय इमारत परिसरात अपर जिल्हाधिकारी श्रीमती रूपाली आवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध विभागाचे विभाग प्रमुख,अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.


 
Top