उस्मानाबाद / प्रतिनिधी-

देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय मार्फत आर्थिक दुर्बल घटकातील वृद्धांना मोफत उपकरणे देण्याची राष्ट्रीय वयोश्री योजना राबविण्यात येत असून उस्मानाबाद जिल्ह्यात या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणी ची सुरुवात रविवार दिनांक ८ मे रोजी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा मेडिकल कॉलेज, तेरणा डेंटल कॉलेज, तेरणा फिजिओथेरपी कॉलेज व जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शासकीय रुग्णालयात उस्मानाबाद येथे विशेष आरोग्य शिबिर आयोजित करून करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी दिली आहे.

 या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील वयोमानानुसार दिव्यांगत्व आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्र आधारे त्यांच्या आवश्यकतेनुसार विविध उपकरणे दिली जाणार आहेत. यामध्ये चष्मा, चालण्यासाठी काठी, कृत्रिम दात, कवळी, श्रवणयंत्र, व्हीलचेअर, ट्रायपॉड, एलबो क्रचेस आदी उपकरणे मोफत दिली जाणार आहेत. 

 उस्मानाबादसह राज्यातील ११ जिल्ह्यांचा या योजनेमध्ये समावेश आहे. ६० वर्षाच्या पुढील दारिद्र रेषेखालील कुटुंबातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत. आज महाराष्ट्र दिनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार करण्यात आला असून भारतीय जनता पार्टीच्या बुथ प्रमुखांना आपल्या बूथ मधील गरजू व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी आज ग्रुप कॉल द्वारे बुथ प्रमुखांना संबोधित करताना केले आहे. 

 दिनांक ८ मे रोजी जिल्हा शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून दारिद्र रेषेखालील कुटुंबातील ६० वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांनी तपासणी करून त्यांना गरजेचे उपकरणाबद्दल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तदनंतर पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत समाविष्ट उपकरणे देण्यात येणार आहेत. गरीब कुटुंबातील वृद्धांना आधार देणारी ही योजना असून यासाठी दारिद्र रेषेखालील कुटुंबाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, फोटो, रेशन कार्ड, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळत असल्यास त्याचा पुरावा एवढ्याच कागदपत्रांची आवश्यकता आहे.

 पुढील काळात तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून शिबिरे आयोजित करून ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. 


 
Top