उस्मानाबाद / प्रतिनिधी-

‘बूथ तेथे उद्योग’ या उपक्रमाला मोठे यश लाभत असून अनेक युवक - युवती आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत नवीन उद्योग सुरु करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. हा उपक्रम स्थानिक अर्थकारणाला मोठे बळ देत जिल्ह्याचा कायापालट करेल हा विश्वास व्यक्त करत, आपण केलेल्या संकल्पाची ध्येय पूर्ती कडे होत असलेली  वाटचाल  समाधानकारक  असून  महिलांनी  एकत्रित  येवून  पुढील  काळात  उद्योगांचे  समुह उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी तुळजाई पापड उद्योगाच्या उद्घाटन प्रसंगी केले.

 भारतीय जनता युवा मोर्च्याच्या जिल्हा सरचिटणीस देवकन्या गाडे यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या बूथ तेथे उद्योग संकल्पनेस प्रतिसाद देत आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा च्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेत सांजा ता. उस्मानाबाद येथे पापड बनविण्याचा उद्योग सुरु केला आहे. या उद्योगाचे उद्घघाटन दि. १६/०५/२०२२ रोजी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

 देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील युवक - युवती देखील उद्योजक होत आहेत. जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कौडगाव येथे एमआयडीसी करण्यात आली, मात्र राज्य सरकारच्या अनास्थेमुळे येथे एकही उद्योग उभारला जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांना रोजगार स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी ‘बुथ तेथे उद्योग’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली असून उद्योग उभारणीसाठी आवश्यक ती मदत करत, २५ - ३५ % अनुदान व कर्ज मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जात आहे. या योजनेला सर्व घटकातील युवक - युवतींचा उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळत आहे व हा उपक्रम स्थानिक अर्थकारणाला मोठे बळ देत जिल्ह्याचा कायापालट करेल असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.

 ‘आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर उस्मानाबाद ‘ उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६५० प्रस्ताव जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कर्ज मंजुरीसाठी बँकेकडे पाठविण्यात आले आहेत, कर्ज मंजुरीसह काही उद्योग प्रत्यक्षात सुरु देखील झाले आहेत. प्रती तास ५०० पापड निर्मितीच्या या व्यवसायला भांडवल उभारण्यासाठी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातुन भारतीय स्टेट बँकेकडून रु. ३ लक्ष कर्ज मिळाले आहे. या योजनेंतर्गत २५% अनुदान मिळते व दरमहा किमान रु. ३० हजार उत्पन्न अपेक्षित आहे. एकुण तीन महिला यावरती काम करणार आहेत. भविष्यात या व्यवसायातुन निघणारे उत्पन्न पाहुन यावर आधारित अनेक महिलांना एकत्रीत करत याचे कलस्टर उभारण्याचा मानस देवकन्या गाडे यांनी व्यक्त  केला. त्यांच्या व्यवसायाची वृद्धी ही युवती व महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

 यावेळी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, संघटन सरचिटणीस देवा नायकल,  मुकुंदा सूर्यवंशी, श्रीराम बापू सूर्यवंशी, किरण नायकल, सदानंद सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी, आशिष नायकल, कु.देवकन्या गाडे, विद्या माने, धर्मराज सूर्यवंशी, रमेश आवटे, बाळू सुर्यवंशी, सुनील नाना सूर्यवंशी, विकास सूर्यवंशी, बप्पा सूर्यवंशी, अण्णा कदम, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top