मुरूम, / प्रतिनिधी-

 येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयास विद्यापीठीय शैक्षणिक मूल्यांकनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून    ‘ अ ‘ मानांकन नुकतेच प्राप्त झाले आहे. 

या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांचा ज्येष्ठ प्रा. दिनकर बिराजदार यांच्या हस्ते बुधवारी (ता.१८) रोजी सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाची सुसज्ज व पायाभूत सेवा-सुविधांनी युक्त इमारत, शैक्षणिक गुणवत्ता, अत्याधुनिक क्लासरूम, स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा (इंटरनेट), अद्यावत सभागृह, स्वतंत्र ग्रंथालय व वाचन कक्ष (सॉफ्टवेअरसह), आयसीटी टूल्स, सीसीटीव्ही, जनित्र यंत्रना, विश्राम गृह, आपत्ती विषयक सोयी, पीएच.डी. संशोधन केंद्र, पदव्युत्तर विभाग, वनस्पती व औषधी उद्यान, क्रिडा संकुल (बंदिस्त क्रीडागृह व क्रीडांगण), मुलींचे वसतीगृह, तीनशे स्वयंसेवकांचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा आजीवन व विस्तार सेवा केंद्राकडून ग्रामीण पत्रकारिता अभ्यासक्रम, वाहन तळ, महाविद्यालय निसर्गरम्य, हिरवागार व स्वच्छ परिसर आदी सेवा-सुविधांमुळे व उपक्रमशीलतेबद्ल महाविद्यालयास विद्यापीठीय शैक्षणिक मूल्यांकनामध्ये ‘ अ ‘ मानांकन प्राप्त झाले आहे. प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक ऑडिट समितीचे समन्वयक प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. रवि आळंगे, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. सुशील मठपती, प्रा. सचिन राजमाने, प्रा. लक्ष्मण पवार, कार्यालयीन अधीक्षक प्रदिप दिंडेगावे, मुख्य लिपिक राजू ढगे आदींनी नामांकनासाठी पुढाकार घेतला होता. या त्यांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी आदिंनी त्यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.

 


 
Top