उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

इंडियन मेडिकल कौन्सिलच्या अटी, शर्तीत कोणती जागा बसणार याचा अहवाल शहरात बांधण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी तीन जागा प्रस्तावित असून, या तिन्ही जागांची पाहणी राज्यस्तरीय त्री स्तरीय समितीकडून नुकतीच करण्यात आली. इंडियन मेडीकल कौन्सिलच्या अटी व शर्तींमध्ये कोणती जागा बसते, याची पाहणी समितीने केली असून याचा गोपनिय अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. 

वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादेत बांधण्यासाठी तीन जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआय तसेच गावसूद रस्त्यावरील खदाणीच्या परिसरातील ४२६ सर्वे क्रमांकाची जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. या जागांची आणखी एका समितीने नुकतीच पाहणी केली. डॉ. नायगावकर, डॉ. सितापुरे, डॉ. जाधव या लातूर वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या टीमने पाहणी केली. त्यांच्या समवेत महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी तसेच अधिष्ठाता डॉ. राठोड हेही उपस्थित होते.

 
Top