उमरगा / प्रतिनिधी-

 उमरगा तालुका भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या  वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिना निमित्याने शुक्रवारी नगर पालिके समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्या समोर अभिवादन करण्यात आले. कुन्हाळी येथील कालकथीत पंडितराव ढोणे यांच्या 8 व्या स्मृती दिनानिमित्त युगप्रवर्तक बहुउद्देशीय सामाजिक फाउंडेशन चे अध्यक्ष सतीश ढोणे यांच्या कडून एकुरगा येथील स्नेहा प्रभाकर गायकवाड, या विध्यार्थीनिस बी,एस,सी नर्सिंगचें  शैक्षणिक साहित्य पुस्तके दान देण्यात आले. शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शिवाजी साखरे, अंबादास जाधव यांच्या हस्ते करण्यात आले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील आणि 100 सेंकद स्तब्ध राहुन अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.संजीव कांबळे यांनी केलें आभार तालुका अध्यक्ष संतोष सुरवसे यांनी मानले, यावेळी तालुका सरचिटणीस प्रभाकर गायकवाड ,कोषाध्यक्ष जिवन सुर्यवंशी, ॲड.म्हलारी बनसोडे, ॲड हीराजी पांढरे,रामभाऊ गायकवाड, उमाजी गायकवाड, अविनाश भालेराव, नागनाथ कांबळे, राजेंद्र सुर्यवंशी तात्याराव मांदळे, प्रकाश कांबळे,जिवन सुर्यवंशी,प्रा.रमेश जकाते, बालाजी गायकवाड , विजय ओवांडकर , गोविंद जाधव , राघवेंद्र गावडे, ॲड.संदीप सवई, ॲड.मंमाळे, आनंद कांबळे,कीरण कांबळे,जी.एल कांबळे, विश्वास सोनकांबळे यांच्या सह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, वकील,शिक्षक, पत्रकार, व भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top