उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती नीवा जैन यांची पोलीस उपमहानिरीक्षक पदोन्नती होउन नागपूर पोलीस आयुक्तालयात अतिरीक्त पोलीस आयुक्त पदावर दि. 21 एप्रील रोजी बदली जाहिर झाली होती. त्यास अनुसरून आज दि. 7 मे रोजी त्यांनी मुख्यालयातील समारंभात अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनित काँवत यांना पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सोपवला असून बदलीकामी त्या कार्यमुक्त झाल्या आहेत. यावेळी जिल्हा पोलीस दलातर्फे त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देउन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास जिल्हा पोलीस दलातील बहुसंख्य अधिकारी- अंमलदार व मंत्रालयीन कारकुन उपस्थित होते.

 
Top