उस्मानाबाद (प्रतिनिधी)

डाॅ.शंकरराव खरात यांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास मिळाला होता व त्यांचे समवेत कार्य ही केले होते ,त्यामुळे डाॅ.शंकरराव खरातांच्या वडीलांनी  तराळकी करत त्यांना उच्य शिक्षण देऊन तेंव्हाचे मराठवाडा विद्यापीठ ,आताचे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू केले होते त्याचा इतिहास त्यांनी “तराळ अंतराळ”या आत्मकथनात मांडलेला आहे.

डाॅ.शंकरराव खरातांनी आटपाडी सारख्या ठिकानी जे भोगले होते व अनुभवले होते ते कधीही विसरले नाहित सूरवातीला त्यांनी पुण्यासारख्या ठिकानी वकीली केली व उपेक्षित माणसाला न्याय दिला.त्यांनी दहा कादंब—या,बारा कथासंग्रह,पाच ललित संग्रह,वैचारिक आठ ग्रंथ लिहीले व केवळ दलित साहित्यच नाही तर मराठी साहित्य त्यांनी समृध्द केले. त्यामुळेच १९८४ला जळगाव येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले होते.आपल्या साहित्यातून त्यांनी गावकुसाबाहेरील व भटक्या विमुक्त व बारा बलुतेदारी करणा—या उपेक्षित व वंचित माणसांच्या व्यथा व वेदना त्यांनी साहित्यातून मांडल्याचे प्रतिपादन लेखक प्रा.राजा जगताप यांनी डाॅ.शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी, जि.सांगली.व बहुजन संघटक लाईव्ह फेसबुक पेज यांनी डाॅ.शंकराव खरात यांचे जन्मशताब्दी वर्षानिमित्त नुकत्याच  आॅनलाईनने आयोजित केलेल्या “डाॅ.शंकरराव खरात व्यक्ती आणि वाड्:मय”” या विषयावर बोलताना उस्मानाबाद येथून केले आहे.अध्यक्षस्थानी डाॅ.शंकरराव खरात प्रतिष्ठानचे सचिव विलास खरात होते.यावेळी आॅनलाईनने महाराष्ट्रातील शंकरराव खरात यांचेवर प्रेम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख वक्ते यांचा परीचय बहुजन संघटकचे राहूल खांडेकर यांनी करून दिला.

पुढे बोलताना प्रा.जगताप म्हणाले की,डाॅ.शंकरराव खरातांनी साहित्य लेखन करतानाच सामाजिक व शैक्षणिक क्षेञातही योगदान दिले आहे.सांगोला तालुक्यातील चोपडी येथे ,त्यावेळी पिण्याच्या पाण्याच्या विहीरीचे उदघाटन करून त्यांनी तेथील होलार समाजातील नाना भागाप्पा केंगारच्या अकरावी पास झालेल्या शंकरला सरकारी नौकरी लावायला मदत केली होती.१९४६मध्ये आटपाडी येथील डबई कुरणातील जमिन त्यावेळी सरकारने दलित समाजाला कसायला दिली होती परंतु सनदी अधिकारी आडकाठी आणत होते ती जमिन डाॅ.शंकरराव खरातांनी डाॅ.बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मिळवून दिली होती.

डाॅ.शंकरराव खरातांनी देशाचा सुवर्ण महोत्सव सूरू असताना ते आटपाडी परीसरातील दलित समाज,भटका व विमुक्त समाज आणि बलुतेदारी करणारा वंचित समाज यांचे दारोदारी जाऊन त्यांचा विकास झाला का? याचा शोध घेऊन त्यांनी “स्वातंञ्य कुणाच्या दारी?” हा ललित लेख संग्रह लिहीला व उपेक्षितांच्या व्यथा,वेदना त्यांनी मांडल्या.

शेवटी व्याख्यानाचा समारोप करताना आटपाडी गावचे भूषण, साहित्यरत्न डाॅ.शंकरराव खरात यांच्या साहित्याची जपनुक होण्यासाठी त्यांचे जन्मशताब्दी वर्षात त्यांचे स्मारक बांधावे व त्यासाठी राज्य शासनाने सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

यावेळी डाॅ.शंकरराव खरात प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डाॅ.शकुंतला शंकरराव खरात,उपाध्यक्ष डाॅ.रविंद्र खरात ,बहुजन संघटकचे राहूल खांडेकर,हरिष स्थुल,सौरभ गणार  उपस्थित होते


 
Top