तुळजापूर / प्रतिनिधी-

  तालुक्यात बनावट बोगस मुन्नाभाई डाँक्टरांचा सुळसुळाट ग्रामीण भागात वाढला असुन  गोरगरीब अशिक्षित मंडळींनवर आरोग्य विभागाचा  नियमानुसार उपचार न करता  मनमानी उपचार करुन ही मंडळी ग्रामीण भागातील ग्रामस्थांची अर्थिक लुटमार करीत आहेत व त्यांच्या जीवाशी खेळत आहेत.

 तुळजापूर तालुक्यात खाजगी दवाखान्याचा उपचार परडवत नसल्याचा फायदा  घेत अनेक मुन्नाभाई डाँक्टरांनी आपले दवाखाने खेड्यात थाटले आहेत.शहरात खाजगी दवाखान्यात कंपाऊडर म्हणून काम  करणारे कंपाऊंडर सध्या ग्रामीण भागात दवाखाने उघडुन बसले आहेत अनेकांनी या व्यवसायावर दवाखाने सुरू करून राजरोस उपचार करीत आहे.

उपचार करताना वेदनाशामक औषधे इंजेक्शन देवुन उपचार करीत असल्याने खेडुताना वेदनाशामक औषध इंजेक्शनमुळे तात्काळ बरे वाटत असल्याने या डाँक्टरांचा उपचाराचा बोलबोला होत असुन अशिक्षित मंडळी यांच्याकडे उपचार घेत आहेत .सध्या हे मुन्नाभाई गावात प्रतिष्ठात देवमाणुस डाँक्टर म्हणून वावरीत आहेत. एककंदरीत तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील   मुन्नाभाई डाँक्टरांंना शोधुन त्यांच्यावर कारवाई करावी या कामी सरपंच, ग्रामसेवक , तलाटी यांची मदत घेण्याची मागणी होत आहे.

 
Top