तुळजापूर / प्रतिनिधी-

 कोरोना पार्श्वभूमीवर दोन वर्षापासुन श्री तुळजाभवानी मातेस भाविकांच्या अभिषेक बंद होत्या. त्या मंगळवार दि.२४पासुन   आरंभ झाल्याने भाविकांनसह पुजारी वृंदांनी श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान ने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 सोमवार दि.२३ रोजी श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान विश्वस्त तथा आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत तिन्ही पुजारी मंडळ पदाधिकाऱ्यांची चर्चा होवुन यात देविजीस पुनश्च भाविकांचे अभिषेक सुरु करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

  महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या अभिषेक पुजा सुरु करण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या  बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत जिल्हाधिकारी तथा श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावक, विश्वस्त आ.राणाजगजितसिंह पाटी, विश्वस्त उपविभागीय अधिकारी  योगेश खैरमाटे,  विश्वस्त तथा तहसिलदार सौदागर तांदळे यांची उपस्थिती होती. 

 आता  दररोज सकाळी 6 ते 9 या वेळेत अभिषेक पूजा होणार आहेत . तुळजाभवानी देवीला सकाळी व सायंकाळी रोज अभिषेक पूजा असते मात्र आता केवळ सकाळी अभिषेक पूजा सुरु होणार आहे , सायंकाळच्या अभिषेक पूजेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही . 

  सुचनांचे पालन होणार -

 ,  श्री देविजींच्या मुर्तीचे जतन करणे , अभिषेकासंबंधी पुरातत्त्व खात्याच्या सूचना व न्यायालयीन निर्णय इत्यादीच्या अनुषंगाने श्रीदेविजींचे मूळ मुर्तीवर अभिषेक करावा किंवा कसे ? याबाबत शासनाकडे पुढील मार्गदर्शनास्तव प्रस्ताव सादर करण्यात आलेला असून त्याबाबत मार्गदर्शन प्रलंबित आहे . सबब सदर पत्राच्या मार्गदर्शन / निर्देशांचे अधीन राहून दररोज सकाळी ०६:०० ते सकाळी ० ९ : ०० या वेळेत श्रीदेविजींच मुर्तीस चांदीचे आवरण लावून सर्व भाविक भक्तांचे अभिषेक पुजा दिनांक २४/०५/२०२२ पासून सुरु करण्यास मा . विश्वस्त समितीचे दिनांक २३/०५/२०२२ रोजीचे परिपत्रक   ठरावाद्वारे मान्यता देण्यात आली आहे . तसेच सदर अभिषेकावेळी भेसळ नसलेले दही व दुध   यांचा वापर करुन देऊळ कवायतमधील नियमांचे काटेकोरपणे पालन करीत अभिषेक पुजा कराव्यात अशा सुचना मा . विश्वस्त समितीने परिपत्रक ठरावाद्वारे दिलेल्या आहेत . श्रीदेविजींचे अभिषेक पुजेची सदर व्यवस्था विधी व न्याय विभाग तसेच पुरातत्व विभाग यांचेकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशांचे अनुपालन करणेचे अधिन राहुन तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात येत आहे , याची सर्वांनी नोंद घ्यावी .असे आवाहन  तहसीलदार तथा व्यवस्थापक ( प्रशासन ) , श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान , तुळजापूर यांनी केले आहे.

 
Top