उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन  लासरा ता. कळंब येथे  करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात लासरा व परिसरातील सर्व वयोगटातील ३२५ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटन अशोक भाऊ शिंदे (विश्वस्त तेरणा पब्लीक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद) यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे दत्ता साळुंके (माजी सभापती प.सं.कळंब),  नवनाथ मदने (सरपंच), विजय धायमुळे (उप सरपंच), गणपती मदने, संपत शेळके, संभाजी शेळके, अशोक आंबऋशी शेळके, कचरु शेळके, अशोक सुधाकर शेळके, पिराजी गोरे सर, तसेच शिराढोण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ.बिदरकर मॅडम, केंद्रे सर (MPW), आशा कार्यकर्ती ज्योती कोळेकर, आशा वाणकर, प्रभावती कटकुरे, भाग्यश्री मुंडे, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प्रास्ताविक प्रा.डॉ.तुळशीराम उकिरडे यांनी केले, तसेच दत्ता साळुंके (माजी सभापती पं.स.कळंब) यांनी मनोगत मांडले, व अध्यक्षीय समोरोप अशोक भाऊ शिंदे (विश्वस्त तेरणा पब्लीक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद) यांनी केले.

 यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.अक्षय बहीर, डॉ.आकाश बहीर, डॉ.शुभम सिंगटकर, डॉ.आशिष पुरोहीत, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. या मध्ये गावातील रुग्ण, माहिला, ज्येष्ठ नागरीक, बालके आदिनी या शिबिरामध्ये उपचार करून घेतले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजित पाटील, विनोद ओहळ (जनसंपर्क अधिकारी), नामदेव शेळके (कळंब तालुका जनसेवा केंद्र प्रमुख), पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना शिंदे, यांनी परीश्रम घेतले.


 
Top