उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय  व विशेष सहाय्य विभागातील राज्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समिती  यांच्याकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून समितीमार्फत विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवणे सुलभ व्हावे याकरीता जिल्हयाच्या विविध भागात शिबीरे घेण्यात येत आहेत दि. 5 मे 2022 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविदयालय लोहारा येथे विदयार्थ्यासाठी तालुका स्तरीय शिबीर घेण्यात आले.सदर शिबीरामध्ये समिती अध्यक्ष डॉ.बी.जी. पवार,सदस्या  छाया गाडेकर व सदस्य सचिव संतोषकुमार नाईकवाडी यांनी मार्गदर्शन केले शिबीराच्या ठिकाणी विदयार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज भरून घेण्यात आले.परिपूर्ण अर्ज सादर केलेल्या 11 विदयार्थ्यांना त्याच ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.सदर शिबीरासाठी संस्थेचे अध्यक्ष व्यकंटराव जावळे पाटील,महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य बी.एल.जाधव,काकासाहेब आनंदगावकर,समितीचे अभिलेखपाल  सुर्यकांत कठारे,व्यवस्थापक  विशाल लगदिवे यांनी परिश्रम घेतले.

 उस्मानाबाद जिल्हयातील 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी,व्यावसाईक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यात इच्छुक विद्यार्थी सी.ई.टी देणारे,डिप्लोमा तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपली जात वैधतेची प्रकरणे समितीकडे सादर करावीत.असे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे.


 
Top