उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तक्रारदार यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमधून ठिबक आणि तुषार सिंचन सठ मागील काही महिन्यापूर्वी घेतले होते त्याचे अनुदान तक्रारदार यांना प्राप्त होते तसेच तक्रारदार यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत तक्रारदार यांच्या भावाच्या नावाने तुषार सिंचन सठ घेतला असून   सदर कामाचे अनुदान मिळणेसाठी शासनास ऑनलाईन अहवाल पाठवण्यासाठी आणि तक्रारदार यांचे यापूर्वी केलेल्या कामाचे अहवाल सादर केले म्हणून  आलोसे अलका लिंबाजी सांगळे वय 42 वर्षे, कृषी पर्यवेक्षक ( वर्ग -3),

तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद यांनी तक्रारदार यांचेकडे 4000 रु. लाचेची मागणी करून तडजोडी अँटी 2000 रु. लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारली .यावेळी त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, औरंगाबाद परीक्षेत्राचे राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी श्री. विकास राठोड यांच्या सुचनेनुसार करण्यात आली.सापळा पथकात पोलिस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके व चालक दत्तात्रय करडे आदींचा समावेश होता .

 
Top