उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत राज्यातील एकूण 114.93 लाख नोंदणीकृत लाभार्थ्यांची बँक खाती आधार संलग्न करण्याचे निर्देश दिले आहेत.राज्यात सद्दस्थितीत एकूण 109.33 लाख लाभार्थ्यांना रक्कम रुपये 18,120,23 कोटी रक्कमेचा लाभ अदा केला आहे.सदर लाभ मिळालेल्या एकूण 109.33 लाख लाभार्थ्यापैकी काही लाभार्थ्याच्या खात्यात आधार आधारित पेमेंट होत आहे.तरी केंद्र शासनाने या योजनेअंतर्गत देय लाभ माहे एप्रिल,2022 पासून लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यात आधार आधारीत अदा करण्याचे प्रस्तावित केले आहे.

 केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे उस्मानाबाद जिल्हयातील लाभार्थ्यांनी बॅकेमध्ये स्वत: जाऊन पी.एम.किसान योजनेचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे असे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 
Top