उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  केाविड-19 मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकांना सानुगृह अनुदान रु.50,000/- मिळणेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यात आले आहेत.

  सदरील अर्जाची तपासणी करतांना काही त्रूटी निघाल्यामुळे जे अर्ज रिजेक्ट झाले आहेत.तसेच ज्यांना Apply to GRC असा मॅसेज आला आहे.त्या व्यक्तींना सुनावणीसाठी तारीख देण्यात आल्या होत्या त्या व्यक्ती उपस्थित राहू शकले नाहीत अशांनी दिनांक 10 मे 2022 रोजी नियोजन भवन येथील जिल्हाधिकारी कार्यालय, येथे दु.12-00 वाजता मूळ कागदपत्रासह उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

 
Top