उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 परिक्षेत्र औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रसन्न  यांनी      केजचे सहाय्यक पोलिस अधिक्षक   पंकज कुमावत यांना दिलेल्या आदेशा अन्वये   उस्मानाबाद शहरात असलेल्या अवैध धंद्यावर दि. 13 मे रोजी रात्री उशीरा कारवाई करण्यात आली आहे. कारवाईमध्ये  १५ लाख ४९ हजार १९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर जागेवरच ५५ जणांना पकडण्यात आले. एकुण ६५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विशेष पुलिस महािनरीक्षकाच्या खास पथकाने ही कारवाई आनंदनगर पुलिस ठाणे व शहर पोलिस ठाणे हद्दीत केली आहे. या कार्रवाईमुळे शहरातील अवैध धंदे उघडे पडले आहेत.  

उस्मानाबाद शहरातील मार्केट यार्ड सोलापूर रोड अंबिका ऑनलाईन लॉटरी जुगार अड्ड्यावर छापा मारून 4 इसमांना जागी ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून एकूण 135480 ताब्यात घेऊन 4  आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

 केला आहे. तर   शिवाजी चौक दीपक फुल स्टॉल शेजारी चपने कॉम्प्लेक्समध्ये ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा मारून त्यांचेकडून एकूण 59 280 रुपये चामाल जप्त करून 6 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच  हॉटेल नाज शेजारी ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा मारून 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची ताब्यातून एकुण 115 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.  व  हॉटेल लजीज शेजारील ऑनलाईन जुगार अड्डयावर छापा मारून 5 आरोपींना  ताब्यात घेऊन त्यांचेकडून  एकूण 62 000 रु चा माल जप्त करून एकूण 7 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

तसेच नाज होटेल शेजारी पाथरूड गल्ली येथे ऑनलाईन जुगार अड्ड्यावर छापा मारून 4 आरोपींना  ताब्यात देऊन त्यांच्या ताब्यातून  एकूण 71625 चा माल जप्त करून 4 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. व  अडत लाईन समोरील समोरील टपरी मध्ये कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा मारून2 इसमाना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून  एकूण 25 700 रुपयांचा माल जप्त करून तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच साईबाबा ट्रेडर्स येथे छापा मारून एक इसम ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून गोवा गुटख्याचा माल एकूण 5 लाख 29482 रुपयाचा माल ताब्यात घेऊन 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . 

तर आनंद नगर पोलीस ठाणे हद्दीत तुळजाई शॉपिंग मध्ये    सूर्या बिर्याणी हाऊस दुकानात बिंगो जुगार गेम वर रेड मारून 13 इसमांना  ताब्यात घेऊन त्यांचेकडून एकूण 2 लाख 26870 रुपयाचा माल जप्त करून   14 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे . व   नितीन ऑनलाईन लॉटरी जुगारावर छापा मारून 6 इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून  एकूण 

1 लाख 91530 रुपयाचा मालजप्त करून 8 विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे व  अंबिका ऑनलाईन लॉटरी जुगार अड्ड्यावर छापा मारून  7 जणांना जागीच ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 1 लाख 8540 रुपये जप्त करून एकूण 10 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तसेच  हरमन चहा टपरीच्या  बाजूला मिलन नाईट जुगार अड्ड्यावर छापा मारून 3 इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून  एकूण 23 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

एकंदर विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने कारवाई केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. मध्यंतरी आनंदनगर पोलिस ठाणे अंतर्गत चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर प्रसिध्दी माध्यमासह सर्वांकडून टिका झाल्यावर त्यावर कांही प्रमाणात आळा घालण्यात आला. 

 
Top