परांडा / प्रतिनिधी : -

 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात आई क्यू ए सी आणि वाणिज्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या करिअर संदर्भात अवरणेस अबाउट फायनान्शियल सर्व्हिसेस अँड करियर इंन बँकिंग सेक्टर या विषयावर एक दिवशीय आर्थिक जागरुकता या विषयावर  मार्गदर्शन कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले होते .

या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ महेशकुमार माने ,वाणिज्य मंडळाचे चेअरमन डॉ संतोष काळे , गणित विभाग प्रमुख डॉ विद्याधर नलवडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ सचिन चव्हाण आणि शारीरिक शिक्षण विभागाचे विभाग  प्रमुख डॉ कृष्णा परभणे यांची उपस्थिती होती .यावेळी वरिष्ठ  कला ,वाणिज्य व विज्ञान विभागातील एकूण 47 विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन कार्यक्रमात सहभाग नोंदवला .यावेळी एचडीएफसी सेल्स सोलापूर च्या एक्झिक्यूटिव्ह श्रीमती तेजश्री कुलकर्णी , लक्ष्मी रेड्डी , प्रियदर्शनी अडके ,महेश मुळे आणि नागेश वाघमारे यांनी या करिअर  मार्गदर्शन कार्यक्रमात मार्गदर्शन केले .

       पुढे बोलताना तेजश्री कुलकर्णी म्हणाल्या की विद्यार्थ्यांना फायनान्शियल सेक्टर मध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहेत . त्या संधी ओळखून विद्यार्थ्यांनी आपले करियर करावे .आर्थिक गुंतवणूक हीसुद्धा काळाची गरज असल्याने विद्यार्थ्यांनी आतापासूनच गुंतवणूकीची सवय लावून घ्यावी . शेवटी अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ महेश कुमार माने म्हणाले की महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर त्यांच्या करिअर संदर्भात अनेक करियर निगडित उपक्रम राबविले जातात . त्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून स्वतःचा फायदा करून घ्यावा महाविद्यालयाचे उद्दिष्ट हेच असल्याने महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा . कार्यक्रमाचे  प्रास्ताविक व  सूत्रसंचालन  प्रा.डॉ विद्याधर नलवडे यांनी केले तर आभार वाणिज्य मंडळाचे चेअरमन डॉ संतोष काळे यांनी मानले .

 
Top