उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन  लोहगाव ता. तुळजापुर येथे  करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात लोहगाव व परिसरातील सर्व वयोगटातील २७५ महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उदघाटन सौ.अस्मिताताई कांबळे (मा.जि.प.अध्यक्ष उस्मानाबाद) यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे सौ.रेणुकाताई भिवा इंगोले (सभापती पंचायत समिती तुळजापुर), गणेश सोनटक्के (माज जिल्हा परिषद सदस्य उस्मानाबाद), नागनाथ फडताळे, वाघमारे सर (मुख्याध्यापक जि.प.शाळा लोहगाव), भिवाजी इंगोले (माजी उपसरपंच लोहगाव), राजकुमार पाटील, रवीकांत शिंगाडे, शिवाजी गायकवाड, मारोती लांडगे, काशीनाथ मारेकर, बालाजी मारेकर, रंगनाथ दबडे, अतुल दबडे, बालाजी हरिश्चंद्र दबडे, शुभम मारेकर, विजय जाधव,‍ हनुमंत लांडगे, बालाजी दबडे, भरत बनसोडे, अंगद इंगोले, प्रशांत दबडे, अक्षय मारेकर, सुदर्शन मारेकर, भिमाशंकर शिंदे, विजय दत्तु दबडे, भूषण जगताप, नेताजी दबडे, अशोक इंगोले, तसेच सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प्रास्ताविक प्रा.डॉ.तुळशीराम उकिरडे यांनी केले व मा. भिवाजी इंगोले, सौ. अस्मिताताई कांबळे यांनी मनोगत मांडले

यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.निलेश येळापुरे, डॉ.जय पटेल, डॉ.सुरज पवार, डॉ.परवीन सय्यद, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. या मध्ये गावातील रुग्ण, माहिला, ज्येष्ठ नागरीक, बालके आदिनी या शिबिरामध्ये उपचार करून घेतले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे सुजित पाटील, विनोद ओहळ (जनसंपर्क अधिकारी), पवन वाघमारे, निशीकांत लोकरे, रवी शिंदे, नाना शिंदे, आशा कार्यकर्त्या सौ.वर्षा हनुमंत फडताळे, सौ. शोभा बालाजी काकरे, यांनी परीश्रम घेतले.

 
Top