कळंब  / प्रतिनिधी-

 कळंब येथील नामांकित डॉक्टर स्वर्गीय डॉक्टर श्रीकिशन जी काकाणी यांचे नातू आणि डॉक्टर सुयोग काकाणी यांचे लहान बंधू डॉक्टर सौरभ काकाणी यांनी नुकतीच एमडी रेडिओलॉजी ही पदवी प्राप्त केली.

डॉक्टर सौरभ यांनी एमबीबीएसचे शिक्षण सायन येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर रेडिओलॉजी मध्ये पदव्युत्तर शिक्षण एमजीएम कॉलेज औरंगाबाद येथे पूर्ण केले.

त्यांचे शालेय शिक्षण सावित्रीबाई फुले विद्यालय कळंब येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे झाले.

डॉक्टर सौरभ काकाणी यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्वांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 
Top