उस्मानाबाद (प्रतिनिधी) 

मांडवा येथील 3 आंब्याचा डोह नदीवरील सिमेंट बंधारा आणि नाली खोलीकरणाच्या कामाचे उद्घाटन नुकतेच  (5 मे) करण्यात आले. या भागातील 200 पेक्षा जास्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

 आयसीआयसीआय फाउंडेशनच्या पुढाकारातून हे काम केले जात आहे. फाउंडेशनच्या महाराष्ट्र झोनल अधिकारी मोनिका आचार्य यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

 यावेळी प्रकल्प संचालक दीपक पाटील, स्वप्नील ढेकळे,जिल्हा समन्वयक राहुल परिहार, समुह समन्वयक मारुती थोडसरे,सुनील पाटील ग्रामपंचायत सदस्य उमेश देशमुख यांच्यासह यासीन पठाण,दत्तात्रय देशमुख, उपसरपंच भगतसिंह गहेरवार यावेळी उपस्थित होते.

 सिमेंट बंधारा नाली खोलीकरण कामासाठी शेतकऱ्याकडून 20 % आणि फाऊंडेशनच्या माध्यमातून 80% रक्कम खर्च केली जाणार आहे. या कामासाठी अंदाजे 15 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.        गावातील विधवा आणि परित्यक्ता महिलांसाठी देखील लवकरच फाउंडेशन च्या माध्यमातून रोजगाराच्या दृष्टीने राबवला जाणार आहे असे यावेळी सांगण्यात आले. 

 
Top