उस्मानाबाद  / प्रतिनिधी : -

 पवित्र रमजान ईदनिमित्त सारोळा (बुद्रूक ता.जि. उस्मानाबाद) येथे धनंजय (भैय्यासाहेब) रणदिवे मित्रमंडळाच्या वतीने मंगळवारी (दि.२६) इफ्तार पार्टी देण्यात आली. तसेच मुस्लिम बांधवांना टी- शर्टचे  वाटप करण्यात आले. 

इफ्तार पार्टीत मोठ्या संख्येने हिंदू, मुस्लीम सहभागी झाले होते. यावेळी एकात्मतेचे दर्शन घडले.

सारोळा येथील मस्जिदमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. बोरगाव राजे  येथील माजी सरपंच  अतिक पठाण यांच्या हस्ते  टी- शर्टचे वाटप करण्यात आले.

 यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब उर्फ श्रीकृष्ण रणदिवे, दारफळचे सरपंच अँड. संजय भोरे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रा.पं सदस्य तेजस सुरवसे, राजश्री शाहू महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव उर्फ बलराज रणदिवे, धनंजय रणदिवे मित्रमंडळाचे संस्थापक तथा ग्रा.पं. सदस्य विनोद बाकले,   प्रा. बाजीराव जाधवर, पांडूरंग कुदळे, आयुब मुजावर, खय्युम मुजावर, बाळासाहेब मुजावर, राजुरी शाखाध्यक्ष पत्रकार शाहरूख सय्यद, शाबोद्दीन सय्यद, मुरादसाहेब मुजावर,  शरिफ सय्यद, मंजूर शेख, मिया मुजावर, करिम मुजावर, हमीद मुजावर, राजु मुजावर, गुलाब मुजावर, अस्मम मुजावर आदींसह समाज बांधव उपस्थित होते.


 
Top