परंडा / प्रतिनिधी : -

समाजातील प्रत्येक व्यक्तीला अन्याय विरुद्ध उठाव करण्याचे सामर्थ्य आणि जाणीव केवळ शिक्षणामुळेच होते असे प्रतिपादन फुले-आंबेडकर विद्वत सभा महाराष्ट्र राज्याचे समन्वयक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी तालुक्यातील मौजे ढगपिंपरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात  व्यक्त केले . ते या कार्यक्रमाचे व्याख्याते म्हणून उपस्थित होते. मौजे ढगपिंपरी येथे दि.28  रोजी सकाळी 11 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

    या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे हे उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी  प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, जिल्हा सहसचिव मोहन दादा बनसोडे ‘ तालुका महासचिव तथा डिबीए समूहाचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे’ तालुका प्रवक्ता रणधीर ‘मिसाळ, शहराध्यक्ष किरण ,बनसोडे’ युवा कार्यकर्ते प्रदीप परिहार  आदी पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .तसेच ढग पिंपरी येथील सरपंच अशोक गरड ,मेजर अतुल परबत , माजी सरपंच डॉ नवनाथ वाघमोडे ,माजीं सरपंच शशिकांत जाधव , उपसरपंच रमेश गरड , ग्रामपंचायत सदस्य सुरेश नेवारे , बालाजी खर्चे  ,पैलवान संभाजी काळे , बळीराम हिवरे, विष्णू साठे , प्रकाश वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती .  पुढे बोलताना डॉक्टर शहाजी चंदनशिवे म्हणाले की देशातील विषमतेला नष्ट करणारा एकमेव उपाय म्हणजे शिक्षण  होय . डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ शिक्षणा मुळेच या देशाची घटना लिहिली आणि त्यामुळे आज देशात बाबासाहेबांच्या घटनेवर सर्व देशाचे कामकाज  चालते .  देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य मिळाले गरीब-श्रीमंत हा भेदभाव नष्ट करून देशाला एकत्र करण्याचे महान कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले .शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा उद्धाराचा राजमार्ग बाबासाहेबांनी संपूर्ण भारतीयांना दिला .महात्मा फुले यांच्या सामाजिक , शैक्षणिक  ,विषमता निर्मूलनाच्या कार्याचा वारसा डॉ बाबासाहेबांनी पुढे चालविला आणि त्यांना गुरुस्थानी मानून सामाजिक क्रांतीचे कार्य अधिक सक्षम बनविले  .शोषित वर्गाचे शिक्षण झाले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या हस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले .यावेळी ढग पिंपरी येथील माजी उपसरपंच रमेश गरड ,सरपंच अशोक गरड यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के , सचिव मोहनदादा बनसोडे , तालुका महासचिव दयानंद बनसोडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

      उत्सव समितीचे पदाधिकारी बापू हावळे , हनुमंत हावळे , अंकुश हावळे , विष्णू हावळे  ,साहेबराव हावळे , लाला हावळे , गोरख हावळे , धनराज हावळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले या कार्यक्रमाचे संयोजक हरिदास हावळे यांनी सूत्रसंचालन  करून सर्वांचे आभार मानले .

 
Top