उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 व्यवस्थापन शास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,     उप-परिसर उस्मानाबाद येथे दिनांक १ एप्रिल २०२२ रोजी ऑनलाईन “करिअर मॅनेजमेंट” वरती कार्यशाळा आयोजित केली गेली. या कार्यशाळेच्या उद्घाटनास विद्यापीठ उप-परिसराचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड उपस्थित होते. 

उदघाटन प्रसंगी बोलताना मा. संचालक यांनी खाजगी क्षेत्रातील वाढत असणारी नौकरी बाबत अपेक्षा व वाढणाऱ्या संधी. परिसरातील विद्यार्थी कार्पोरेट मध्ये कसा यशस्वी होईल व त्यासाठी काय करणे योग्य आहे ते करण्यासाठी नेहमी विविध उपक्रम विभागा मार्फत राबवले जातात तसेच नवीन संधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देणारा व्यवस्थापन शास्त्र विभाग आहे आसे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव यांनी केले. त्यांनी व्यवस्थापनाचे शिक्षण वयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात कसे महत्वाचे आहे हे नमूद केले. कार्यशाळेस दोन तांत्रिक सत्र ठेवण्यात आले होते. पहिल्या सत्रात डॉ. विक्रम शिंदे यांनी व्यवस्थापनात उपलब्ध संधी व त्यासाठी करावी लागणारी तयारी या बाबत माहिती दिली. द्वितीय सत्रात प्रा. सचिन बस्सैये यांनी २०२२ वर्षी तंत्रशिक्षनालय यांच्या मार्फत होणाऱ्या एम. बी. ए. व एम. सी. ए. प्रवेश नोंदणी प्रक्रिया, कागदपत्र, तारखा, प्रवेशपरीक्षेची तयारी या विषयी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थी यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. २६३ सहभागी विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. 

सदर कार्यशाळा हि मा. कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले, प्रकुलगुरू प्रा. डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव प्रा. डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्टाता प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे, प्रा. डॉ. अभिजित शेळके, डॉ. फारूक खान, उप-कुलसचिव डॉ. दिगंबर नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया सुकाळे तसेच आभार प्रा. धनश्री कोळपे यांनी मानले. सदरील कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी युनिक विभाग औरंगाबाद व विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.


 
Top