तुळजापूर / प्रतिनिधी-

 नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ तुळजापूर येथे कागदापासून विविध वस्तू बनवणे ( ओरिगामी पेपर क्राफ्ट)व मेहंदी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.

   कार्यशाळेचे मार्गदर्शन सेवानिवृत्त कलाशिक्षक  पद्माकर मोकाशी सर यांनी कागदापासून विविध वस्तू बनवण्याचे तसेच सौ .सुप्रिया क्षिरसागर (कावरे) व नेहा कावरे (बडोदकर) यांनी मेहंदी या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन प्रात्यक्षिक घेतले.  कार्यशाळा प्रशिक्षणाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक  गणेश रोचकरी , ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस.बी.गिराम  यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ज्येष्ठ शिक्षक महेंद्र पाटील उपस्थित होते.

 इयत्ता ४ थी ते इ.७ वी च्या विद्यार्थ्यांनी सदरील कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद दिला व कागदापासून विविध वस्तू तयार केल्या. तसेच विविध प्रकारच्या मेहंदी काढल्या.  या कार्यशाळेस गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे विषय तज्ञ अंकुशे सी.एच व  पडवळ एन.के यांचे यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.  प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्रीमती मॅडम एसबी लोहार के.ए,जाधव एम.एस, जाधव एक.बी.सहशिक्षक सुरजमल शेटे, महेंद्र कावरे यांनी परिश्रम घेतले.


 
Top