परंडा / प्रतिनिधी :- 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य  रा गे शिंदे महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक विवेक वसुदेव इंगळे हे तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक 31 मार्च 2022 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत .

      महाविद्यालयाच्या आणि श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेच्या वतीने प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या हस्ते त्यांचा शाल बुके देऊन सेवानिवृत्त निमित्त सत्कार करण्यात आला.

    यावेळी महाविद्यालयातील आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ महेशकुमार माने, स्टॉप सेक्रेटरी डॉ शहाजी चंदनशिवे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रकाश सरवदे, गणित विभाग प्रमुख डॉ विद्याधर नलवडे ,रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ अक्षय घुमरे, ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ अतुल हुंबे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ सचिन चव्हाण, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ विशाल जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यक्रमाधिकारी प्रा सचिन साबळे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा दत्ता मांगले, कार्यालयीन अधिक्षक भाऊसाहेब दीवाने, लिपिक सुभाष शिंदे  वरिष्ठ लिपिक अजित घुमरे ,श्रीमती पद्मा शिंदे आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते .कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले होते.

        यावेळी प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विवेक इंगळे यांच्या तीस वर्षाच्या कामाचा वृतांत मांडला .त्यांनी मनोगत व्यक्त करताना अश्रू अनावर झाले होते.सर्व कर्मचारी भावनांश झाले होते.सत्काराला उत्तर देताना विवेक इंगळे म्हणाले की माझ्या तीस वर्षाच्या सेवांमध्ये माझ्याकडून जर कोणास दुःख झाले असेल ,मी कोणाला अधिकचे बोललो असेल तर मला मोठ्या मनाने माफ करावे .सर्वच कर्मचारी यावेळी भावनावश झाले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले.


 
Top