उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्राचे रूपांतर स्वतंत्र विद्यापीठात व्हावे असा ठराव तुळजाभवानी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्यामध्ये घेण्यात आला. 

स्नेहमेळाव्यास व्यासपीठावर महाविद्यालय विकास समिती सदस्य अशोक मगर, सज्जनराव साळुंके, प्राचार्य डॉ. मणेर व समन्वयक डॉ. वाय. ए. डोके, प्रा. अशपाक आतार यांची उपस्थिती होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या कामासाठी औरंगाबाद येथे जाणे गैरसोयीचे आहे.

 उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ झाल्यास उस्मानाबाद जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाबरोबर विद्यापीठ परिसरामध्ये विद्यार्थ्यांना विविध विषयात संशोधनाची संधी देखील उपलब्ध होईल. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने स्वतंत्र विद्यापीठाचा ठराव डॉ. आनंद मुळे यांनी मांडला तर त्याला अनुमोदन नगरसेवक सुनील रोचकरी यांनी दिले. ठरावाची प्रत तुळजाभवानी महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्या मार्फत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. उदयजी सामंत, कुलगुरू, मा. जिल्हाधिकारी, विद्यापीठ उपपरिसराचे संचालक, खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार कैलाश पाटील यांना पाठवण्यात आली. ठरावावर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उत्तम अमृतराव, अशोक हुंडेकर, डॉ. अमोद जोशी, महेंद्र कावरे, ऍड. किरण कुलकर्णी, तानाजी म्हेत्रे, सचिन घोडके, ऍड. प्रवीण लोमटे, महादेव मुळे, श्रीशैल्य हंगरगेकर, ऋषिकेश कुतवळ, संकेत पाटील, चंद्रकांत नाईकवाडी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top