उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने दि.21 ते 23 एप्रिल 2022 रोजी संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल इंद्रायणी नगर भोसरी जिल्हा पुणे येथे आयोजित राज्यतर वरिष्ठ गट महिला/पुरुष अजिंक्य पद स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातील कु सोनाली पवार या खेळाडूने भाला फेक या क्रीडा प्रकारात भाग घेऊन सुवर्ण पदक(Gold Medal) मिळवले याबद्दल तीचा राज्य अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव सतिश उचिल,उस्मानाबाद जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे  सचिव योगेश थोरबोले यांनी तिला प्राविण्य प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले.ती सध्या योगेश थोरबोले,अरविंद चव्हान,रुपाली झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे

 तिच्या या यशाबद्दल जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष भरत जगताप,शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त चंद्रजित जाधव,अंकुश पाटील, संजय दादा देशमुख,महाराष्ट्र राज्य सायकलिंग संघटनेचे सहसचिव अभय वाघोलीकर,राजेश भवाळ,राज्य शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त कुलदीप सावंत,प्रवीण गडदे,राजेंद्र सोलनकर, संजय कोथळीकर, राजेश बिलकुले,महेश राजेनिंबाळकर, योगेश उपळकर,राम भुतेकर,माऊली भुतेकर,अनिल भोसले,रवि मोहिते,जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे पदाधिकारी व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले.

 
Top