तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने तालुक्यातील माळुंब्रा पंचक्रोषीत  ४ पाझर तलावाचे  दुरुस्ती कामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सदरील कामे दर्जेदार करण्याची मागणी भाजपाचे गजानन वडणे यांनी केली आहे.

या प्रकरणी प्रशासनातील अधिकारी लक्षदेत नसल्याने विधी मंडळ अंदाज समिती सदस्य तुळजापूर तालुका दौऱ्यावर आले असता त्यांच्याकडे या बाबतीत तक्रार करण्यात आली. या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यास तक्रार दिली असता ते त्याची दखल घेण्यास तयार नाही. अशाच पध्दतीने कामे केले गेल्यास कामाचा हेतु साध्य होणार नाही व शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे तरी हे कामे दर्जदार होण्यासाठी आपण योग्य ती दखल घ्यावी असे म्हटले आहे.


 
Top