उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

    पुरोगामी चळवळीतील झुंजार कार्यकर्ती स्मृतीशेष ॲड.भारती रोकडे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त  आई लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमात “ झुंजार भारती “ या  स्मृति ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांगली येथील ज्येष्ठ विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर येथील वालचंद आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चे प्रा. एम. आर. कांबळे, मुंबई येथील जेष्ठ चित्रकार मोग्गलान श्रावस्ती, कवियत्री अनिता जावळे होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उस्मानाबाद येथील साहित्यिक युवराज बप्पा नळे यांनी ॲड. भारती रोकडे यांच्या झंजावाती कारकिर्दीचा त्यांनी आढावा घेतला आणि भारती मॅडम यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगत प्रेक्षकांना अंतर्मुख केले. प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांनी ॲड. भारती यांच्या स्मृती कायम ठेवण्यासाठी लोक उपयोगी कार्यक्रम सातत्याने सुरू ठेवण्याचे आवाहन करून पुरोगामी चळवळीतील खंदया कार्यकर्तीचे जाणे हे नुकसान भरून न निघण्यास सारखे आहे असे प्रतिपादन केले. प्राध्यापक एम आर कांबळे यांनी ओघवत्या शैलीत भारती मॅडमच्या जीवनातील विविध गुणांचा उहा पोह केला, आणि स्त्रियांनी भारती मॅडम सारखे खंबीर व्हावे असे आवाहन केले.स्मृती ग्रंथाचे मुखपृष्ठ चित्रित करणारे मुंबई येथील चित्रकार मोगल्लान श्रावस्ती यांनी भारती मॅडम च्या खंबीर व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखवले.लोकप्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुरेखा जगदाळे यांनी भारती मॅडमच्या सामाजिक कार्याची सुरुवात लोक प्रतिष्ठान मधील बचत गट फेडरेशन त्या कामापासून ते यशस्वी वकीली पर्यंत चा जीवनपट विषद केला. भारती म्हणजे, लंबी  रेस का घोडा होतीअसेही त्या म्हणाल्या. मुरुड येथील कवियत्री अनिता जावळे यांनी ॲड.भारती रोकडे यांच्या अकाली जाण्याने सामाजिक आणि वकिली क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे खंत व्यक्त केली.

 सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सुदेश माळlळे यांनी केले. या कार्यक्रमास शहरातील साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते, वकील मंडळी अधिकारी मंडळी आणि महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

 
Top