तुळजापूर / प्रतिनिधी -  

 तुळजापूर खुर्द येथील श्री तुळजाभवानी मंदिराचा कळसारोहण सोहळा गुरुवार  दि. २८ रोजी सकाळी स्थापित देवता चे पुजन यजमान मंदिर ट्रस्ट अध्यक्ष सौ व श्री विलास जगदाळे यांच्या हस्ते होम  हवनचे पूर्णाहुती होऊन महाआरती करून कळसारोहण चा कार्यक्रम जगद्गुरू श्री शंकराचार्य महाराज, करवीर पीठ (कर्नाटक) देविचे मुख्य मंहात  वाकोजी बुवा व हजारो भावीक भक्तांच्या उपस्थितीत पार पडला व महाप्रसादचा जवळपास ५000 भाविक भक्तनी घेतला.  

 यावेळी श्री तुळजाभवानी मंदिरचे स्वप्नपूर्तीचे जनक माजी मंत्री  श्री.मधुकरराव चव्हाण  ,ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस गोकुळ शिंदे,जि.प.माजी उपाध्यक्ष सौ.अर्चनाताई पाटील,जि प.अध्यक्ष अस्मिताताई कांबळे,पवन राजे मल्टी स्टेट को ऑप सोसायटी चेअरमन जय राजेनिंबाळकर, पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद  ,तहसीलदार सौदागर तांदळे  , नायब तहसीलदार जाधव ,पुजारी मंडळ अध्यक्ष सज्जनराव ,नगरसेवक सुनीलपिंटू रोचकरी, व भावीक भक्त, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सर्व तुळजापूर खुर्द  ग्रामस्थ यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. 

मंदिरचे शिखर बांधकाम करणारे संभाजी आलमले व त्याचे सहकारी यांचा भर पेहराव देऊन सत्कार करण्यात आला. व रात्री सुप्रसिद्ध गायक नंदकुमार कदम यांच्या गोंधळी गीताचा संगीत कार्यक्रम व  हभप दगडू महाराज भुजबळ यांची कीर्तन सेवा झाली व श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट व तुळजापूर खुर्द ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या कळसारोहण सोहळा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानन्यात आले व कळसारोहण विधी सोहळा संपन्न झाला.

 

 
Top