तुळजापूर  / प्रतिनिधी-

 बालाजी अमाईन्स  लिमिटेड, सोलापूर कंपनी यांच्या CSR फंडातून नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 तुळजापूर (खुर्द )च्या शाळेत दोन  वर्गखोल्यांचे भूमिपूजन सोहळा मुख्याधिकारी अरविंद  नातू व बालाजी अमाईन्स कंपनीचे तांत्रिक सल्लागार मल्लीनाथ बिराजदार   यांच्या हस्ते  दोन वर्गखोल्यांचे भूमिपूजन करण्यात आले.

वर्गखोल्याच्या पाठपुराव्यासाठी मा. नगराध्यक्ष श्री.सचिन रोचकरी आणि विनोद गंगणे यांचे सहकार्य लाभले.  बालाजी अमाईन्स लिमिटेड, सोलापूर कंपनीने त्यांच्या CSR फंडामधून  2 वर्गखोल्यांची मान्यता देऊन बालाजी अमाईन्स कंपनीचे तांत्रिक सल्लागार  श्री.मल्लीनाथ बिराजदार साहेब यांच्या हस्ते 2 वर्गखोल्यांचे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजन कार्यक्रमास  बालाजी अमाईन्स चे श्री. दत्तप्रसाद सांजेकर, कंपनी अभियंता  प्रदीप कुडाले, शाळेचे मुख्याध्यापक  तुकाराम मोटे, नगर परिषद तुळजापूर कार्यालयीन अधीक्षक  वैभव पाठक,नगर परिषद अभियंता, प्रशांत चव्हाण  ,नगरसेवक  पंडितराव जगदाळे, नगरसेविका  मंजुषाताई देशमाने, सहशिक्षक अशोक शेडगे , बालाजी साळुंके,  सुभाष राठोड ,  जालिंदर राऊत,  सतीश यादव,  विश्वजीत निडवंचे,  रवी कुमार पवार , .निर्मला कुलकर्णी, निता गायकवाड, कल्पना व्हटकर, मीना वाळा, संजीत देडे यांची उपस्थिती होती.


 
Top