तुळजापूर (प्रतिनिधी) 

तुळजापूर येथील वडिलांचे छत्र हरवलेल्या दिव्यांग लहान भगीनीच्या कुटुंबीयांना राहण्यासाठी योग्य निवारा नसल्याने तुळजापूर प्रहार दिव्यांग संघटनेच्यावतीने घर बांधून देण्यात येणार आहे. घर बांधून देण्याच्या कामाचा शुभारंभ  उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष मयुर काकडे व सामाजिक वनीकरण विभागाचे मनोहर पुंड यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला.

  हा स्तुत्य उपक्रम तुळजापूर प्रहारचे तालुकाध्यक्ष शशिकांत मुळे, तुळजापूर शहराध्यक्ष नागेश कुलकर्णी यांच्या वतीने घेण्यात आला आहे.  यावेळी  जिल्हाध्यक्ष मयुर काकडे सामाजिक वनीकरण विभागाचे वन अधिकारी मनोहर पुंड विनोद कदम ( सर ) तुळजापूर तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष शशिकांत मुळे प्रहार संघटना तुळजापूर तालुका उपाध्यक्ष  शशिकांत गायकवाड तालुका संघटक  सचिन शिंदे शहर अध्यक्ष नागेश कुलकर्णी दशरथ भाकरे अभिमान सगट पांडुरंग नाईकवाडी तसेच आदी प्रहार कार्यकर्ते उपस्थिती होती.

 
Top