तुळजापूर (प्रतिनिधी) 

 तालुक्यातील खंडाळा येथिल महादेवाच्या मानाच्या कावडी सोमवार दि १८ रोजी तिर्थक्षेञ तुळजापुरात दाखल झाल्यानंतर  शिंगणापूर येथील  शंभुमहादेव मंदिरच्या वतिने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी  श्री देवीजींना नउवारी साडी, दवणागोळी व ईबीत अहेर म्हणुन पाठविण्यातआला. त्याचा स्विकार मंदीर संस्थानकडून करण्यात आला. 

 खंडाळा येथील शंभु महादेव काठीची जवळपास 350 वर्षांपासुन खंडाळ्याची कावड शिंगणापुर पर्यंत व परतीचा प्रवास 13 दिवसांत पुर्ण करून.. खंडाळा येथे परत येतात.. कावडी परत आलेल्या दिवशी खंडाळा येथे नगर प्रदक्षिणा घातली जाते या दिवशी ग्रामदैवत श्री शंभुमहादेवाची याञा भरते.. सांस्कृतीक कार्यक्रम, कुस्त्या असे विविध कार्यक्रम जञेनिमित्त आयोजित केले जातात.

 
Top