तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील माळुंब्रा येथील जिल्हापरिषद शाळेच्या शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती सदस्यपदी ग्रामपंचायत सदस्या सौ. भाग्यश्री विनोद देवकर  यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

ही निवड येत्या दोन वर्षासाठी आहे.  या  निवडचे सर्वच स्तरातुन स्वागत होत आहे.यावेळी  तंटामुक्त अध्यक्ष  गणेश वडणे,माध्यमिक शाळेचे अध्यक्ष नाना गाटे, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.

 
Top