उमरगा / प्रतिनिधी-

  हजारो हिंदू - मुस्लिम बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील हजरत सय्यद बाशा दर्गा यात्रेनिमित्त शनिवारी ( दि. २) सांयकाळी संदल मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान कोरोनाचे निर्बंध उठविल्याने रविवारी   चिराग निमित्त शहर व परिसरातील असंख्य भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

शनिवारी सांयकाळी चार वाजता वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. सांयकाळी मानकरी विजयकुमार पाटील यांच्या हस्ते चादर चढवण्यात आली. त्यानंतर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सांयकाळी विनावाद्य संदल शरिफ (मिरवणूक) काढण्यात आली. रविवारी सकाळी हिंदु - मुस्लिम बांधवांनी दर्ग्यातील “मजार” ला पाणी घातले. चिराग व ऊर्सनिमित्त दिवसभर आणि रात्री दहापर्यंत हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ऊरूस समिती अध्यक्ष जाहेद मुल्ला, उपाध्यक्ष सय्यद मुल्ला, असलम शेख, सत्तार मुल्ला, महेबुब मुल्ला, महमदसाब सास्तुरे, राजु कुंभार, अविनाश काळे, रसुल शेख, महेबुब उजळंबे, बबलु बलसुरे, मुसा मुल्ला, मशाक फुलारी, जब्बार मुल्ला, बाबु मुल्ला, फिरोज बाशिंदे, अल्लाउद्दीन उजळंबे, कैलास काळे, रज्जाक शेख, इस्राईल शेख, इब्राहीम मुल्ला, निसार मुल्ला आदींनी ऊरुसच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेतला. 


 
Top