तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर खुर्द जवळ असणाऱ्या तडवळा पाटी  ते तडवळा  या एक किलोमीटर रस्त्यावर खड्डे पडुन  अक्षरशा चाळणी झाल्याने तडवळा ग्रामवासियांचे मोठे हाल होत आहेत. या रस्ताची तातडीने दुरुस्ती करुन त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.

 तिर्थक्षेञ तुळजापूर शहराच्या हद्दीवर तडवळा गाव असुन हे गाव मोर्डा तडवळा ग्रुप ग्रामपंचायत मध्ये येथे या गावाचा संपुर्ण व्यवहार तुळजापूरशी निगडीत असल्याने या गावातील मंडळींना दरारोज तुळजापूरला विविध कामासाठी यावे लागते.  लोकप्रतिनिधींचा दुर्लक्षामुळे गेली अनेक वर्षापासुन या गावातील ग्रामस्थांचे रस्ता अभावी हाल होत असल्याने हा रस्ता त्वरीत दुरुस्ती करुन ग्रामस्थांना शालेय विद्यार्थ्यी व ग्रामस्थांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. 

 
Top