उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचे प्रा. मारुती अभिमान लोंढे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे.

लोंढे यांच्या संशोधनाचा विषय ‘सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि पंढरपूर तालुक्यातील ठिबक सिंचनाच्या विकासाचा  तौलनिक अभ्यास’ हा होता. त्यांचे पीएच.डी. चे मार्गदर्शक प्राचार्य डॉ.बी. एच.दामजी हे होते. त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन ठिबक सिंचन या ज्वलंत विषयावर मोलाचे संशोधन केलेले आहे. त्यामुळे प्रा. मारुती अभिमान लोंढे यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक  केले जात आहे व ठिबक सिंचना विषयी त्यांच्याकडून शेतकरी मार्गदर्शन घेत आहेत.

 प्रा.मारुती लोंढे यांनी यापूर्वी अर्थशास्त्र विषयातील एकूण 28 पुस्तकांचे लेखन केले आहे.तर त्यांचे 63 शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत.त्यांनी अनेक वेळा स्पर्धा परीक्षा आणि नेट सेट या परीक्षा संबंधी आकाशवाणीवर मुलाखती दिलेल्या आहेत व महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षा या विषयावर व्याख्याने दिलेली आहेत.त्यांची वळण ही ग्रामीण कादंबरी सुप्रसिद्ध आहे. त्यांनी दोन लघुपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. या संशोधन कार्यात त्यांना प्रा.डॉ.जी.एस.कांबळे, प्रा.प्रमोद शहा,डॉ.विजय कुंभार,डॉ.अनिल वावरे,डॉ.सतीश घाडगे, डॉ.रुपेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले तर या यशाबद्धल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे,सचिव प्राचार्य शुभांगी गावडे,डॉ. अशोक करांडे (माजी सहसचिव प्रशासन),  मुख्य कार्यकारी अधिकारी मा.,कौस्तुभ गावडे,मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख व सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी  त्यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top