उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतात मुलींची पहिली शाळा स्थापन करुन आपल्या विचारांची निर्भयपणे मांडणी करणारे स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, नायब तहसीलदार पंकज मंदाडे, चेतन पाटील, श्रीमती अर्चना मैंदर्गी आणि इतर अधिकारी-कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 
Top