उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भीम निर्णायक युवा समूहाच्या वतीने क्रांतिसूर्य म.ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले . प्रारंभ क्रांतीज्योती  महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन भाई उद्धवराव पाटील,  शिक्षक सह. पतसंस्थेचे सचिव आयुष्यमान अमरसिंह देशमुख व बसपाचे नेते संजय वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले . 

 यावेळी भीमनिर्णायक युवा समूहाचे संस्थापक अध्यक्ष सचिन दिलपाक, बहुजन एकता विकास परिषदेचे प्रशांत बनसोडे , सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष आनंद गाडे , कुंदन भीमराव सुरते , महादेव माने , सुरज सुरते , दादाराव लोखंडे ,प्रफुल्ल गायकवाड , विष्णू कांबळे आदी बहुजन बांधव उपस्थित होते .


 
Top