उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नैतिकता, भौतिकता ,मानवता यांचा संयोग म्हणजेच सेक्युलॅरिझम असल्याचे, प्रतिपादन  प्रा. गौतमीपुत्र कांबळे केले.

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या  व्याख्यानमालेच्या  पहिल्या पुष्पात कांबळे बोलत होते.ते  डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधान आणि सेक्युलॅरिझम या विषयावर बोलत होते. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे संपन्न झाला .

यापुढे प्रा.गौतमीपुत्र कांबळे म्हणाले की, विवेकवाद आणि विज्ञानवाद स्वीकारता आला पाहिजे .श्रद्धा सोडल्याशिवाय विवेकवाद येत नाही शिक्षण राजकारण यामध्ये धर्माने ढवळाढवळ करू नये. पण तो सध्या वाढलेला आहे मानवी दुःख गुलामगिरी आणि शोषण हे धर्माच्या श्रद्धेतून आलेले आहे कोरोना काळात सर्व  प्रार्थना स्थळे बंद होती त्यामुळे काही कोणाचे अडले का? असा प्रश्न करून प्रा. गौतमपुत्र कांबळे यांनी उपस्थित केला.

या व्याख्यानमालेचा पहिल्या पुष्पाचे अध्यक्ष विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे होते या कार्यक्रमाची सुरुवातीस मान्यवर संस्था प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला   कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्रा. रवी सुरवसे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र अंगरखे सर यांनी केले व आभार पंडित कांबळे यांनी मानले या कार्यक्रमास शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top