तुळजापूर / प्रतिनिधी-

राजकारण घाला चुलीत असे स्पष्ट करीत सत्ताधरी विरोधक  जनतेच्या  मुलभुत प्रश्नांना वाचा न फोडता तेरीभी चुप मेरी भी चुप म्हणून ऐकमेकावर चिखल फेक करीत जनतेचे लक्ष इतरञ करण्याचा प्रयत्न करीत असुन हे आम्ही यशस्वी होवु देणार नाही यासाठीच हुंकार  याञा सुरु केल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तुळजापूरात पञकारांशी संवाद साधताना केले.

यावेळी बोलताना शेट्टी पुढे म्हणाले अतिरिक्त ऊस प्रश्न प्रशासनाने स्वताहुन निर्माण केला असुन उस क्षेत्र वाढलाय हे दीड वर्षपुर्वी सरकारला माहीती झाले होते तरी या बाबतीत कुठलेही नियोजन न केल्याने आज शेतकऱ्यांचा ऊस अठरा महिने झाले शेतकऱ्यांच्या शेतात उभा आहे. तसेच आठराशे शेतकऱ्यांचे बळी घेवुन कृषी कायदा मागे घेण-या भाजपा सोबत जाणार नसल्याचे स्पष्ट करुन शेतकऱ्यांना न्याय देणे दबावगट तयार करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे हाच आमचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले .

हमीभाव कायदेशीर रित्या बंधनकारक करणे गरजेचे असुन तरच शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल असा कायदा करण्यासाठी आम्ही संघर्ष करणार असल्याचे शेवटी म्हणाले. यावेळी  रवींद्र ईगंळे, धनाजी पेंदे्र, राजाभाऊ हाके, गुरु भोजने, नेताजी जमदाङे, पदिप जगदाळे, संतोष भोजने, शहाजी सोमवशी व शेतकरी उपस्थित होते.

 
Top