तुळजापूर / प्रतिनिधी-

शहरातील  जुन्या बसस्थानक चौकात गुरुवार दि. ७रोजी दुपारी  आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी  किरीट  सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारुन दहन आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख शाम पवार,  शिवसेना शहर प्रमुख सुधीर कदम,  शिवसेना उपतालुकाप्रमुख सुनील जाधव, शिवसेना उपशहर प्रमुख बापूसाहेब नाईकवाडी,  बाळासाहेब शिंदे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रतीक रोचकरी,  युवासेना जिल्हा चिटणीस लखन परमेश्वर, विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले, युवा सेना शहर प्रमुख सागर इंगळे,  शिवसेना विभाग प्रमुख अनिल भोपळे, शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, शंकर लोंभे, दिनेश रसाळ,  सौदागर जाधव, शिवसेना विभाग प्रमुख बालाजी पांचाळ, युवा सेना उपशहर प्रमुख वैभव चोपदार, शिवसेना विभाग प्रमुख गणेश रोकडे, युवा सेना कार्याध्यक्ष प्रदीप इंगळे, कृष्णा झाडपिडे, प्रेम कदम,  प्रसाद उंडरे, कालिदास नाईकवाडी, कुंभार गुरुनाथ,  समाधान ढवळ आदींनी भाग घेतला. 

 
Top