उस्मानाबाद / प्रतिनिधी-

किरीट सोम्मया यांनी  आयएनएस विक्रांतच्या नावाखाली भावनिकतेने जनतेकडुन पैसा गोळा केला व राजभवन येथे तो पैसा जमा केला असे खोटे सांगुन जनतेची दिशाभूल केली सोमय्याला तत्काळ अटक करावी अशा घोषणा देत शिवसेनेच्या वतीने गुरूवार िद. ८ एप्रील रोजी छत्रपती  शिवाजी महाराज चौक उस्मानाबाद येथे   सोमय्या यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यानंतर शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनात देण्यात आले.

या आंदोलनात   नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर,  राजेंद्र घोडके,  उपजिल्हाप्रमुख  विजय  सस्ते,  तालुकाप्रमुख  सतीशकुमार सोमाणी , शहरप्रमुख आबा मुंडे  , सोमनाथ गुरव, युवासेना जिल्हाप्रमुख तथा विभागीय सचिव  अक्षय ढोबळे,   नगरसेवक  सुरज  साळुंखे,   सरपंच  संजय भोरे, युवासेना तालुकाप्रमुख   वैभव वीर,   मुकेश पाटील ,आमोल मुळे,राजेद्र भांगे,राजु तुपे नेताजी पाटील,सौदागर जगताप, अण्णा पवार  व शिवसैनिक व युवासैनीक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते  .

भाजपा नेते धुतल्या तांदाळा सारखे आहेत का ?

वाचळ वीर सोमय्याने निधी गोळा करून राज भवनात पैसे पाठविले नाहीत, त्यांना तात्काळ अटक करावी, शिवसेना नेत्यांवर आरोप करणारे धुतल्या तादळासारखे स्वच्छ आहेत का ? अशी प्रतिक्रिया यावेळी तालुका प्रमुख सतिश सोमानी यांनी दिली. 

विनाकारण लोकप्रतिनिधींना त्रास

ईडीच्या कारवाया होण्या अगोदरच सोमय्या अगोदरच जाहीर करतो, या प्रकरणाची महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने चौकशी करावी, त्याचप्रमाणे आयएनएस बोट निधी प्रकरणी सोमय्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करून माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी केंद्र सरकार विनाकारण लोकप्रतिनिधींना त्रास देत असल्याची प्रतिक्रिया िदली. 


 
Top