उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नांदेड येथील प्रसिद्ध तरुण बांधकाम व्यावसायिक व माहेश्वरी सभेचे सक्रिय कार्यकर्ते संजय बियाणी यांची भर रस्त्यात गोळ्या घालून निर्घृण हत्या झाल्याची घटना नांदेड शहरात घडली आहे. भरदिवसा घडलेली ही घटना निंदणीय असून माहेश्वरी समाजावर यामुळे मोठा आघात झाला आहे. बियाणी यांच्या मारेकर्‍यांचा तात्काळ शोध घेऊन अटक करावी. तसेच त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी उस्मानाबाद जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने करण्यात आली आहे.

 उस्मानाबाद येथे बुधवारी (दि.6) माहेश्वरी सभेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले की, संजय बियाणी हे दानशूर व्यक्तीमत्व आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्ते होते. अशा तरुण समाजबांधवाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या हाीेणे ही अतिशय निंदणीय व चिंताजनक बाब आहे. समाजाला काळीमा फासणार्‍या या घटनेचा उस्मानाबाद जिल्हा माहेश्वरी सभा तीव्र निषेध करत असून समाजात भीतीचे वातोवरण निर्माण झालेले आहे. या घटनेची सखोल चौकशी करुन मारेकर्‍यांना तात्काळ अटक करुन कठोर शासन व्हावे व बियाणी परिवारास न्याय मिळवून द्यावा, असेही निवेदनात नमूद केले आहे.

 निवेदनावर माहेश्वरी सभेचे प्रदेशाध्यक्ष श्रीकिशन भन्साळी, प्रदेश सचिव मदनलाल मिणियार, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष गिरधारी चांडक, जिल्हा सचिव जुगलकिशोर लोया, तालुकाध्यक्ष कचरुलाल मिणियार, जिल्हा माहेश्वरी युवा संघटनचे जिल्हाध्यक्ष अनुप बांगड, सचिव विनय सारडा, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, विजयकुमार बंग, विजयकुमार भन्साळी, बजरंग मिणियार, अरुण राठी, जगदीश मोदानी, रामनिवास मोदानी, नारायणदास भन्साळी, रमेश सारडा, शिवप्रसाद मिणियार, राजकुमार भन्साळी, श्रीकिशन सारडा, राधाकिशन भन्साळी, सतीशकुमार सोमाणी, श्यामसुंदर बांगड, नंदकिशोर नोगजा, धनराज मुंदडा, अमित मोदानी, राजेश बांगड, जुगलकिशोर मोदानी, विजय मंत्री, जयकिशन सारडा, राधेश्याम गिल्डा, शैलेश बांगड, सौरभ चांडक आदींची स्वाक्षरी आहे.

 
Top