उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कला व सांस्कृतिक विभाग प्रदेश संघटकपदी अहेमद बिन मोहम्मद चाऊस यांची निवड करण्यात आली आहे. कला व सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षा विद्या कदम यांनी ही निवड केली असून  या नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष  तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते चाऊस यांना देण्यात आले.

 उस्मानाबाद शहरातील हॉटेल पुष्पक पार्क येथे हा निवड समारंभ पार पडला.  यावेळी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक महेबूबपाशा पटेल, दर्शन कोळगे, आरिफ मुलाणी आदी उपस्थित होते. चाऊस यांच्या निवडीचे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.

 
Top