तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर तालुक्यात रविवारी सांयकाळी वादळीवा-यासह झालेल्या  मुसळधार  अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक गावातील झालेल्या नुकसानीची पाहणी खा. ओमराजे निंबाळकर यांनी   सोमवार दि  11  रोजी करुन ग्रामस्थांना धीर देवुन संबंधित अधिकारी  मंडळीना मदत करण्या बाबतीत सुचना केल्या. 

यात  गंधोरा गावांमध्ये चक्रीवादळाने अनेक घराचे पत्रे उडून गेलेले आहेत व संसारोपयोगी साहित्य पूर्ण भिजलेले होते याची पाहणी केली नंतर कीलज टेलरनगर युवती सह नुकसान भागात जावुन पाहणी केली व  उध्वस्त झालेल्या कुटुंबाला धीर दिला व संबंधित शासकीय अधिकारी त्यांना ताबडतोब पंचनामे करण्यास व मदत देण्यास तहसीलदार  सांगितल.   खासदार यांच्याबरोबर  तहसीलदार सौदागर तांदळे,  कृषी विभागाचे एस.पी जाधव,  े कार्यकारी अभियंता गुजर, तलाठी ,ग्रामसेवक उपस्थितीत होते. 


 
Top