तुळजापूर / प्रतिनिधी- 

अखिल भारत वर्षीय अवधूत भेष बारह पंत योगी महासभा , श्री क्षेत्र तुळजापूर येथील “ सिद्ध बाबा गरीबनाथ “ मठाचे महंत श्री महंत मावजीनाथ गुरु तुकनाथ बाबा यांचा कानचिरा विधी झाला आहे. त्या निम्मित गंगाजल भंडारा  उद्या  रविवार दिनांक १/०५/२०२२रोजी  विधी आयोजित केला आहे.

  नाथ योगी अठराचे पूर्व महंत श्री सोमवारनाथजी ( चिरा गुरु ) महंत सोमवारनाथजी श्री क्षेत्र त्रंबकेश्वर चे पीर योगी गणेशनाथजी सोनारी भैरव पीर शामनाथजी पीर गणेशनाथजी व साधू संत यांची स्वागत शोभा यात्रा आयोजित केलीआहे. यानिमित्त दिनांक १/०५/२०२२ रोजी रात्री ८:०० वा . नाथ संप्रदाय विधी विषयी योगी सागरनाथ कारभारी हंडी भडंगनाथ मठ , कर्नाटक यांचे कीर्तन होणार आहे

 सोमवार दि २ रोजी स . १०:३० कल्लोळ तीर्थ व गोमुख तीर्थ गंगाजल अभिषेक होईल व महाप्रसाद व साधू संतांची बिदाई होईल . “ तरी सर्व भाविकांनी व भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  सिद्ध बाबा गरिबानाथ मठ , ( दशावतार ) महंत मावजीनाथजी यांनी केले आहे.

 
Top